
Tata Motors Share Price | शेअर बाजारातील घसरणीत देखील टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवारी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 2.65 टक्क्यांनी घसरून 724.30 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी 1,179.05 रुपयांवरून जवळपास 38 टक्क्यांनी घसरला आहे. 30 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनी शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता. दरम्यान, टाटा मोटर्स कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
टाटा मोटर्स शेअर टार्गेट प्राईस
एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. उत्तरार्धात देशांतर्गत व्यावसायिक वाहनांची (सीव्ही) मागणी वाढू शकते आणि कंपनीकडून नुकत्याच लाँच झालेल्या नवीन कार्समुळे सपोर्ट मिळण्याचा अंदाज एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने व्यक्त केला आहे. एलकेपी सिक्युरिटीज ब्रोकरेजने टाटा मोटर्स शेअरसाठी 970 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीपेक्षा 30 टक्के जास्त परतावा मिळू शकतो.
कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला नुकताच उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून १,२९७ बस चेसिसचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. टाटा मोटर्स कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘कंपनीला यूपीएसआरटीसी’कडून वर्षभरात प्राप्त झालेला हा तिसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. कंपनीला एकूण साडेतीन हजारांहून अधिक युनिट्सचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. टाटा मोटर्स कंपनीकडून एलपीओ 1618 डिझेल बस चेसिस विशेषत: शहरांमधील आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन केली गेली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
टाटा मोटर्सचे नोव्हेंबरमधील विक्रीचे आकडे
नोव्हेंबर महिन्यात टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीची एकूण विक्री वाढून ७४,७५३ वाहनांवर पोहोचली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात विक्री ७४,१७२ युनिट्स होती. नोव्हेंबर 2024 मध्ये देशांतर्गत एकूण विक्री १ टक्क्याने वाढून ७३,२४६ युनिट झाली होती, जी नोव्हेंबर २०२३ मध्ये ७२,६४७ युनिट्स इतकी होती. इलेक्ट्रिक वाहनांसह (पीव्ही) एकूण प्रवासी वाहनांची विक्री नोव्हेंबर 2024 मध्ये 2 टक्क्यांनी वाढून 47,117 वाहनांवर पोहोचली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.