
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी 8 वर्षांची उच्चांक किंमत पातळी ओलांडली आहे. या स्टॉकमध्ये अशीच तेजी कायम राहील असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 623.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 626.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉक वाढीचे कारण
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये एवढी जबरदस्त वाढ होण्याचे दोन कारण तज्ञांनी सांगितले आहे. पहिले कारण म्हणजे शेअर बाजारातील सकारात्मक भावनामुळे गुंतवणूकदारांनी टाटा मोटर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. आणि दुसरे कारण म्हणजे टाटा मोटर्स कंपनीच्या UK आर्म JLR च्या घाऊक विक्रीत 30 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 93,253 युनिट्स वाहन विक्री नोंदवली आहे. या शिवाय टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओमुळे देखील टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत.
टाटा मोटर्स शेअर टार्गेट प्राईस
टाटा मोटर्स कंपनीची गुंतवणूक असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO लवकरच बाजारात येणार आहे. या IPO च्या माध्यमातून टाटा मोटर्स कंपनी आपला वाटा विकणार आहे. टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक सोमवारी 634.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ही कंपनीची 8 वर्षातील उच्चांक किंमत आहे. 2023 हे वर्ष टाटा मोटर्स कंपनीच्या स्थिर गुंतवणूकदारांसाठी मजबूत कमाई करून देणारे ठरले आहे.
या काळात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 475 टक्के परतावा कमावून दिला आहे. चॉईस ब्रोकिंग तज्ज्ञांच्या मते टाटा मोटर्स स्टॉक पुढील काळात 650 रुपये किंमत स्पर्श करेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.