15 December 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Tata Technologies IPO| टाटा टेक्नॉलॉजी IPO लाँच होण्यास सज्ज, गुंतवणूक करून फायदा घेणार? आधी IPO तपशील जाणून घ्या

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | मागील काही महिन्यांपासून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO येणार, अशी बातमी येत होती. आता मात्र गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. पुढील महिन्यांत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त असल्याने कंपनीच्या IPO ला सेबीची मान्यता मिळाली आहे.

या IPO इश्यूमुळे आयपीओ मुळे शेअर मार्केटमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळेल, असे तज्ञांचे मत आहे. मागील वर्षी एलआयसी, पेटीएमसह अनेक मोठ्या कंपन्यांचे IPO आले. मात्र त्यांनी गुंतवणूकदारांची घोर निराशा केली होती. अशा परिस्थितीत, आता गुंतवणूकदारांना टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO कडून खूप अपेक्षा लागल्या आहेत.

कंपनीचा व्यवसाय

टाटा टेक्नॉलॉजी ही जागतिक दर्जाची अभियांत्रिकी उत्पादन आणि डिजिटल सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी टाटा मोटर्स कंपनीचे युनिट म्हणून काम करते. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीत टाटा मोटर्स कंपनीने 74.68 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी उत्पादन विकास आणि डिजिटल समाधान सेवा तसेच अनेक जागतिक मूळ उपकरण उत्पादकांना सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीत सध्या 11,000 कर्मचारी काम करत असून कंपनीचे 18 जागतिक वितरण केंद्रे चालू आहेत.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने मार्च 2023 मध्ये सेबीकडे IPO लाँच करण्यासाठी अर्ज केला होता. त्याला लवकरच शेअर बाजार नियामकाकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या कंपनीचा IPO हा अंक पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. याचा अर्थ ही कंपनी कोणतेही फ्रेश शेअर्स बाजारात विकणार नाही. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रवर्तक 9.57 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. जर कंपनीच्या एकूण पेड अप भाग भांडवलाच्या 23.60 टक्के आहेत.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची मूळ कंपनी टाटा मोटर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत 8.11 कोटी शेअर्स विकणार असल्याची बातमी मिळत आहे. हे प्रमाण टाटा मोटर्सच्या एकूण भाग भांडवलाच्या 20 टक्के भाग आहेत. या व्यतिरिक्त अल्फा टीसी होल्डिंग्स फर्म देखील आपले 97.16 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. टाटा कॅपिटल ग्रोथ फंड देखील टाटा टेक्नॉलॉजीचे 48.58 लाख शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO च्या आकाराबद्दल अद्याप पूर्ण माहिती जाहीर झालेली नाही.

डिसेंबर 2022 पर्यंत महणेजच आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या 9 महिन्यांच्या कालावधीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या महसुलात YOY आधारावर 15 टक्के वाढ नोंदवली गेली होती. या कालावधीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने एकूण 3,052 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कंपनीच्या एकूण महसुलात सेवा विभागाचा वाटा 88 टक्के असून त्यात निव्वळ नफा 407 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

अनलिस्टेड मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची किंमत अंदाजे 850 रुपये असण्याची शक्यता आहे. 750 रुपये किमतीच्या आसपास या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. तर शेअरची किंमत 900 रुपये पर्यंत देखील पोहचली होती, असे तज्ञ म्हणतात. अशा परिस्थितीत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स चांगल्या प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO is ready to launch check details on 12 June 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x