
Tata Power Share Price | दुसऱ्या तिमाही निकालानंतर टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये (NSE: TATAPOWER) आले आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी टाटा पॉवर पॉवर शेअर तेजीत होता. शुक्रवारी टाटा पॉवर शेअर 4.15% वाढून 444.70 रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे टाटा पॉवर शेअरबाबत ब्रोकरेज फर्म सकारात्मक संकेत देत आहेत. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीकडून मोठी गुंतवणुक
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने १००० मेगावॅट क्षमतेचा पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी ५६६६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने पुढील ४४ महिन्यांच्या कालावधीत भिवपुरी येथे प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पासाठी ७५% रक्कम कर्जाच्या माध्यमातून आणि उर्वरित २५% रक्कम इक्विटी फायनान्सिंगच्या माध्यमातून उभारली जाईल, असे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने म्हटले आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीची सध्याची एकूण क्षमता १५.२ गिगावॅट आहे.
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५०१ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या मते कंपनीचा 2024-27 चा महसूल आणि सीएजीआर अनुक्रमे 10% आणि 15% असेल.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म – रेटिंग अपडेट
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३१५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर्स सेन्सेक्सच्या २५ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत ७८.४ टक्क्यांनी वधारले आहेत.
दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ८ टक्क्यांनी वाढून १,०९३.०८ कोटी रुपये झाला आहे. प्रामुख्याने उत्पन्न वाढल्याने टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत टाटा पॉवर लिमिटेड कंपनीला १,०१७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 16,210.80 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी 2023-24 च्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 16,029.54 कोटी रुपये इतके होते.
टाटा पॉवरची क्षमता
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीची एकूण क्षमता १५.२ गिगावॅट आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी नवीकरणीय आणि पारंपारिक ऊर्जा ते पारेषण, वितरण, व्यापार, स्टोरेज सोल्युशन्स तसेच सौर सेल, मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुंतलेली कंपनी आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.