
Tata Power Share Price | मंगळवारी शेअर बाजारात मजबूत तेजी (SGX Nifty) दिसून आली होती. मंगळवारी शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद (Gift Nifty Live) झाले होते. शेअर बाजार निफ्टी 24450 च्या वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 600 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीची महत्वाची घोषणा
टाटा ग्रुपच्या टाटा पॉवर रिन्युएबल्स एनर्जी लिमिटेड कंपनीने मध्य प्रदेशातील नीमच येथे ४३१ मेगावॅटचा डीसी सौर प्रोजेक्ट सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी येताच टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवार 03 डिसेंबर 2024 रोजी टाटा पॉवर शेअर 2.79 टक्के वाढून 428.10 रुपयांवर पोहोचला होता.
कंपनीने निवेदनात काय माहिती दिली?
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘1635.63 एकरमध्ये पसरलेल्या या प्रोजेक्टमध्ये सिंगल ऍक्सिस ट्रॅकर्स आणि बाय-फेशियल मॉड्यूलचा समावेश आहे. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या या प्रोजेक्ट’मुळे भारतातील सौर ऊर्जा उत्पादनाचा नवा मापदंड प्रस्थापित होणार आहे. या प्रोजेक्टमुळे संपूर्ण कंपनीच्या यंत्रणेची कार्यक्षमता १५ टक्क्यांहून अधिक वाढली असून, वाढीव तासांसाठी जास्तीत जास्त वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे असं कंपनीने म्हटलं आहे.
शेअरने 4,097% परतावा दिला
मागील ५ दिवसात या शेअरने 4.40% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर शेअर 0.22% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 6.23% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 52.05% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर शेअरने 700.19% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 29.61% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना टाटा पॉवर शेअरने 4,097.06% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.