
Tata Power Share Price | टाटा ग्रुपच्या उपकंपनीच्या मोठ्या घोषणेनंतर टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला (SGX Nifty) मिळाली होती. स्टॉक मार्केटला माहिती देताना टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, ‘टाटा पॉवर लिमिटेड कंपनी मध्य प्रदेशात अक्षय ऊर्जा सौर प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रोजेक्टमुळे सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत अधिक बळकट होईल असं कंपनीने म्हटलं आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
सौर प्रकल्पाची माहिती
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने मध्य प्रदेशातील नीमच येथे ४३१ मेगावॅटचा डीसी सौर प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी १६३५.६३ एकर जमिनीची निवड करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामुळे कंपनीच्या यशानंतर वीजपुरवठा तर वाढेलच, शिवाय यंत्रणेची कार्यक्षमताही वाढेल. मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य रेल्वेतील पॉवर मॅनेजमेंट कंपनीलाही याचा पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.
टाटा पॉवर शेअरची सध्याची स्थिती
बुधवार 04 डिसेंबर 2024 रोजी टाटा पॉवर शेअर 0.64 टक्के घसरून 425.80 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 276.50 रुपये होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,35,994 कोटी रुपये आहे.
टाटा पॉवर शेअरने 4,074% परतावा दिला
मागील ५ दिवसात या शेअरने 1.37% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर शेअरने 0.76% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 6.56% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 51.23% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर शेअरने 695.89% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 28.91% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना टाटा पॉवर शेअरने 4,074.51% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.