12 December 2024 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Deccan Gold Share Price | खरंच पैशाची खाण! डेक्कन गोल्ड माईन्स शेअरने अल्पावधीत दिला 415% परतावा, शेअर आजही खरेदीला खास?

Deccan Gold Share Price

Deccan Gold Share Price | डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. तर शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 151.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे (Deccan Gold Mines Share Price) एकूण बाजार भांडवल 2230 कोटी रुपये आहे.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पत्की किंमत 28.70 रुपये होती. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे शेअर 2.61 टक्के घसरणीसह 147.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

डेक्कन गोल्ड माईन्सच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 66 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 91 रुपयेवरून वाढून.151 रुपयेवर गेली आहे. मागील 6 महिन्यांत डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 232 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 415 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीला भालुकोना-जामनीडीह याठिकाणी निकेल, क्रोमियम आणि संबंधित धातूंच्या खाणकामासाठी छत्तीसगड सरकारने काम दिले आहे.

डेक्कन गोल्ड माईन्स ही कंपनी मुख्यतः अत्यावश्यक खनिजांच्या उत्खननाचे काम करते. डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड ही कंपनी भारतात सोन्याचा शोध घेणारी एकमेव सूचीबद्ध कंपनी मानली जाते. 2003 मध्ये एका ऑस्ट्रेलियन प्रवर्तकाने या कंपनीची स्थापना खाण आणि उत्खनन क्षेत्रात आधुनिक पद्धती आणि नवीन मशीनच्या मदतीने सोन्याचा शोध घेण्यासाठी केली होती. ऑक्‍टोबर 2021 मध्‍ये कंपनीच्या व्‍यवस्‍थापनात बदल झाले आणि, डेक्कन गोल्ड माईन्‍स लिमिटेड कंपनीने आपल्‍या व्यवसायात आक्रमक गतीचे प्रदर्शन केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Deccan Gold Share Price NSE 04 November 2023.

हॅशटॅग्स

Deccan Gold Mines share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x