
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 2 टक्के घसरण (NSE: TataPower) पहायला मिळाली होती. या व्यवहारात हा स्टॉक 485.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.55 लाख कोटी रुपये आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 494.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 230.75 रुपये होती. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.25 टक्के घसरणीसह 465.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
टाटा पॉवर स्टॉक टार्गेट प्राइस
ब्रोकरेज फर्म शेअरखानने टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 26 सप्टेंबर 2024 रोजी शेअरखान फर्मने टाटा पॉवर स्टॉकला BUY रेटिंग देऊन 540 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 11 टक्क्यांची वाढ होऊ शकते. टाटा पॉवर कंपनीची नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमता 10.5GW आहे. यापैकी 5.7GW प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत. कंपनीची परिचालन क्षमता 4.8GW आहे, ज्यात 3.8GW सोलर आणि 1 GW क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत.
गुंतवणुकीवर परतावा
टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 19 टक्के वाढली होती. 2024 या वर्षात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 47 टक्क्यांनी घसरले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 681 टक्के वाढली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.