15 December 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News

Highlights:

  • Tata Power Share PriceNSE: TATAPOWER – टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश
  • नोमुरा ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
  • टाटा पॉवर स्टॉक परफॉर्मन्स
Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. मंगळवारी टाटा पॉवर शेअर ४.४ टक्क्यांनी वधारून ४६०.८० रुपयांवर (NSE: TATAPOWER) बंद झाला होता. बुधवारी सुद्धा हा शेअर तेजीत आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.95 टक्के वाढून 465.80 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यामुळे गुंवणूकदार देखील या स्टॉकची जोरदार खरेदी करत असल्याचं पाहायला मिळतंय. तज्ज्ञांनी देखील या स्टॉक बाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)

नोमुरा ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
काल शेअर उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. टाटा पॉवर शेअरच्या तेजी मागे एक चांगली अपडेट देखील कारणीभूत आहे. प्रसिद्ध ग्लोबल नोमुरा ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकिंग फर्म नोमुरा’ने टाटा पॉवर शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी ५६० रुपये ही टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. टाटा पॉवर शेअरची ही टार्गेट प्राईस सध्या किंमतीपेक्षा २७ टक्क्यांनी अधिक आहे.

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
तसेच प्रसिद्ध ग्लोबल मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने देखील टाटा पॉवर शेअरसाठी BUY रेटिंग दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रेटिंग अपग्रेड करून शेअरला ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. तसेच या शेअरसाठी ५७७ रुपये ही टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
दरम्यान, प्रसिद्ध मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने देखील हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ५३० रुपये ही टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की, अक्षय ऊर्जेची क्षमता दुप्पट करणे आणि सौर ईपीसी ऑर्डरबुकमधील मजबूत कामगिरीमुळे हा शेअर पुढे मोठा परतावा देईल.

टाटा पॉवर स्टॉक परफॉर्मन्स
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअरने गेल्या ५ वर्षांत ७०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तसेच कंपनी २००१ पासून लाभांश देखील देतं आहे. मागील १ वर्षात हा शेअर ८२ टक्क्यांनी वधारला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x