IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
Highlights:
- IRB Infra Share Price – NSE: IRB – आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश
- एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंग’मधील अपडेट
- कंपनीच्या एकूण महसूल आणि संबधित राज्य
- कंपनी अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली
- आयआरबी इन्फ्रा कंपनीबद्दल
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आज तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या (NSE: IRB) शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 5.74 टक्के वाढून 59.17 रुपयांवर बंद झाला होता. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.99 टक्के वाढून 60.08 रुपयांवर ट्रेड करत आहे. (आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश)
एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंग’मधील अपडेट
दरम्यान, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने तिमाही निकालातील आकडेवारी जाहीर करताना म्हटले की, कंपनी आणि IRB इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टने सप्टेंबर 2024 मध्ये टोल महसुलात 19% वार्षिक वाढ नोंदविली आणि जी सप्टेंबर 2023 मधील 421 कोटी रुपयांच्या तुलनेत 502 कोटी रुपये झाली आहे.
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला गेल्या वर्षी याच महिन्यात टोल वसुली व्यवसायातून 421 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता, अशी माहिती आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे.
कंपनीच्या एकूण महसूल आणि संबधित राज्य
महाराष्ट्र राज्यातील एकूण १७ टोलमधून आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या एकूण महसूल संकलनात १३६.८ कोटी रुपयांचा मोठा वाटा आहे, तर आयआरबी अहमदाबाद वडोदरा सुपर एक्स्प्रेस टोलवेने ५८.४ कोटी रुपयांचे योगदान दिले.
कंपनी अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली
दरम्यान, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अमिताभ मुरारका अधिक माहिती देताना म्हणाले की, “राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील कंपनीच्या टोल महसुलात सकारात्मक लवचिकता दिसून आली आहे. सणासुदीच्या सीझनचा विचार केल्यास, वाढत्या प्रवास आणि आर्थिक क्रियाकलापांमुळे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी विकास दर कायम ठेवण्याबाबत आशावादी आहे असं म्हणाले.
आयआरबी इन्फ्रा कंपनीबद्दल
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी ही महामार्ग विभागातील देशातील पहिली इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक खाजगी टोल रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासक असून देशभरातील एकूण 12 राज्यांमध्ये 80,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आधार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRB Infra Share Price 09 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - SGX Nifty
- Personal Loan | 'या' 4 टिप्स फॉलो करून मिळवा स्वस्तात स्वस्त पर्सनल लोन; कोणत्याच बँकेकडून नकार मिळणार नाही
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - SGX Nifty
- Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या