
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आज किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. नुकताच टाटा पॉवर कंपनीची (NSE: TATAPOWER) उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडला 400 मेगावॅट क्षमतेचा विंड-सोलर हायब्रिड प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे. टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला हे काम महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी कंपनी लिमिटेड कंपनी मिळाले आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
200 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार
या प्रकल्पाच्या करारानुसार सुरुवातीच्या टप्प्यात 200 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारायचा आहे. उर्वरित 200 मेगावॅट अतिरिक्त क्षमतेसाठी ग्रीनशू पर्याय ठेवला जाईल. हा प्रकल्प टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऊर्जा निर्मिती प्रकल्प असेल. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास 895 दशलक्ष किलोग्राम CO2 कमी होण्यास मदत होईल. आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 439.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
कंपनीची ऊर्जा निर्मिती क्षमता वाढणार
या नवीन ऑर्डरनंतर टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीची ऊर्जा निर्मिती क्षमता 10.5 GW पर्यंत वाढेल. यात 5.7 GW क्षमतेचे स्वतंत्र प्रकल्प देखील सामील आहेत. सध्या टाटा पॉवर कंपनीचे एकूण 4.8 गिगावॅट क्षमतेचे प्रकल्प चालू आहेत. यामध्ये 3.8 गिगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प आणि 1 गिगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प देखील चालू आहे. बुधवारी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या घसरणीसह 440.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
एका वर्षात 66% परतावा दिला
मागील 6 महिन्यांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15.70 टक्के वाढले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 66.90 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 470.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 230.75 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,40,802.64 कोटी रुपये आहे.
Latest Marathi News | Tata Power Share Price 19 September 2024 Marathi News.
Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.