
Tata Power Share Price | शुक्रवार २२ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या तेजीचा फायदा टाटा पॉवर शेअरला सुद्धा (NSE: TATAPOWER) झाला आहे. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 1.18 टक्के वाढून 412.85 रुपयांवर पोहोचला होता. आता टाटा पॉवर लिमिटेड कंपनीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
टाटा पॉवर कंपनीने करार केला
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने माहिती देताना म्हटले आहे की, ‘कंपनीने आपल्या अनेक प्रकल्पांमध्ये 4.25 अब्ज डॉलर्सच्या वित्तपुरवठ्याचे मूल्यांकन करण्यासाठी आशियाई विकास बँकेसोबत करार केला आहे. टाटा पॉवर कंपनीने अझरबैजान’मधील बाकू येथे एडीबीसोबत सामंजस्य करार केला आहे.
कराराबद्दल कंपनीने काय म्हटले
देशातील वीज पायाभूत सुविधा वाढविणे आणि स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने आपल्या अनेक धोरणात्मक प्रकल्पांसाठी वित्तपुरवठ्याचे मूल्यांकन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. टाटा पॉवरच्या या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत सुमारे ४.२५ अब्ज डॉलर आहे असे कंपनीने म्हटले आहे. या करारामध्ये एकूण 966 मेगावॅट सौर पवन संकरित प्रकल्प आणि पंप्ड हायड्रो स्टोरेज प्रकल्प आणि ऊर्जा संक्रमणाशी संबंधित इतर प्रकल्पांसारख्या अनेक मोठ्या चालू प्रकल्पांचा समावेश आहे असं कंपनीने म्हटलं आहे.
टाटा पॉव शेअर टार्गेट प्राईस
ईटी नाऊ वृत्त वाहिनीवर तज्ज्ञांनी टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, टाटा पॉवर लिमिटेड कंपनीमध्ये रिस्क रिवॉर्ड आहे, गुंतवणूकदारांना 395 रुपयांचा स्टॉपलॉस ठेऊन खरेदी करावी लागेल. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअरसाठी 440 ते 450 टार्गेट प्राईस दिली आहे. तज्ज्ञांनी टाटा पॉवर कंपनी शेअरबाबत एकंदरीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
शेअरने 3966% परतावा दिला
मागील ६ महिन्यात टाटा पॉवर शेअर 7.36% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर शेअरने 58.24% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 652.04% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना टाटा पॉवर शेअरने 3,966.18% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 25.57% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.