
Tata Power Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमधे भारतीय शेअर बाजार सपाट कामगिरीसह क्लोज झाला होता. याच काळात सेन्सेक्स (NSE: TATAPOWER) निर्देशांक 14 अंकांच्या किंचित घसरणीसह 84914 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 1 अंकाच्या वाढीसह 25940 अंकावर क्लोज झाला होता. नुकताच चीनच्या सेंट्रल बँकेने व्याजदर कपात करण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी मेटल स्टॉक सर्वाधिक तेजीत आले होते. (टाटा पॉवर लिमिटेड कंपनी अंश)
मोतीलाल ओसवाल फर्म – BUY रेटिंग
मंगळवारी प्रामुख्याने नाल्को, एनएमडीसी, सेल, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, जिंदाल स्टील, वेदांत, हिंदाल्को आणि हिंदुस्थान कॉपर कंपन्यांचे शेअर्स 2 ते 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकवर 530 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के वाढीसह 473.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीचे बाजार भांडवल 148199.85 कोटी रुपये
टाटा पॉवर लिमिटेड ही कंपनी 1919 पासून व्यवसाय करत आहे. ही कंपनी मिडकॅप श्रेणीत असून तिचे बाजार भांडवल 148199.85 कोटी रुपये आहे. ही कंपनी ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. जून तिमाही 2024 मध्ये या कंपनीने 17540.98 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 899 कोटी रुपये नोंदवला गेला होता. टाटा पॉवर कंपनी ही कंपनी टाटा समूहाचा भाग आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 9.5 टक्के भागभांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.