14 December 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

Bigg Boss Marathi Winner | बिग बॉसच्या घरात टास्कचा महाबाप, विजेत्याला मिळणार लखपती होण्याचा मान - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi Winner
  • काय आहे टास्कचा महाबाप :
  • विजेता ट्रॉफीसह मिळवणार 25 लाख रुपये :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi Winner | बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन प्रचंड गाजत आहे. आतापर्यंतच्या बिग बॉस मराठीच्या सीजनमधील पाचव्या सीझनचा टीआरपी उच्चांक गाठताना पाहायला मिळतोय. दरम्यान बीबी हाऊसमध्ये दररोज काही ना काही नवीन घडते. या नवनवीन गोष्टी, टास्क आणि सदस्यांमधील हेराफेरी पाहण्यास प्रेक्षकांना देखील उत्साह वाटतो. अशातच बिग बॉसच्या घरातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.

दरम्यान बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार याकडे समस्त प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी या दोघांमध्ये ट्रॉफीसाठी झुंज होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधान आलं आहे. त्याचबरोबर आजच्या भागात काय घडणार आहे हे सांगणारा एक प्रोमो सोशल मीडियावर वायरल करण्यात आला आहे. यामध्ये बीबींच्या सांगण्याप्रमाणे टास्कचा महाबाप घरामध्ये आला आहे. टास्कचा महाबाप पाहून सदस्यांच्या तोंडच पाणी पळालं आहे.

काय आहे टास्कचा महाबाप :

बिग बॉसच्या घरात आज एक महाबाप टास्क पार पडणार आहे. या टास्कचं नाव महाचक्रव्यूव असं असणार आहे. प्रोमोच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक मोठं चक्रव्यूव बिग बॉसच्या घरात ठेवण्यात आलं आहे. हे चक्रव्यूव दिसायला अतिशय भयंकर आहे. म्हणजेच एकदा चक्रव्युवात एखादा माणूस गेला तर त्याला मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून बाहेर यावं लागेल. त्याचबरोबर बिग बॉस यांनी बिग बॉसची ट्रॉफी उचलणाऱ्या व्यक्तीला म्हणजेचं बिग बॉस विनरला किती कॅश प्राईज मिळणार हे देखील सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

विजेता ट्रॉफीसह मिळवणार 25 लाख रुपये :

प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे बिग बॉस सांगताहेत की,”बिग बॉस मराठीच्या या सीजनच्या विजेत्याला मिळणारी बक्षीसाची रक्कम आहे 25 लाख रुपये. ही प्राईज मनी कमवण्यासाठी मी आणलाय या सीजनमधील सर्व टास्कचा बाप महाचक्रव्यूव”. प्रोमो पाहिल्यानंतर आजचा बिग बॉसचा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

दरम्यान प्रेक्षकांनी त्या प्रोमोच्या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेक प्रेक्षकाने आपल्या आवडत्या सदस्याला पाठिंबा दर्शवत शुभेच्छा दिल्या आहेत. कोणाला अंकिता विजयी होईल असं वाटत आहे. तर, कोणी म्हणतोय,’अभिजीत सावंत विनर होणार’. तर काहींना निक्की तांबोळीने बिग बॉसची ट्रॉफी उचलावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसचा महाअंतिम सोहळा 6 ऑक्टोंबर 2024 ला पार पडणार असून, घरामध्ये आता केवळ 8 सदस्य उरले आहेत. त्यामुळे सदस्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चांगलीचं चढाओढ पाहायला मिळत आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Winner 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x