8 August 2020 10:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा मराठा आरक्षण | मेटे धादांत खोटे बोलत असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिशाभूल करत आहेत मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
x

सुशांतचं सोशल मिडिया अकाऊंट दुसरं कोणतरी हाताळतंय? अनेक शंका उपस्थित

Senior actress and BJP leader Rupa Ganguly, allegations, Sushant Singh Rajput suicide

मुंबई, २६ जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचं कोडं अदयाप उलगडलेलं नाही. ही आत्महत्या नैराश्यामुळे नव्हे तर अन्य कारणामुळे झाली असल्याचा दावा अनेक चाहत्यांकडून केला जात आहे. तर काहीजण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं देखील बोलत आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप नेत्या रूपा गांगुली यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत खळबळजक आरोप केले आहेत. सुशांतचं सोशल मिडिया अकाऊंट इतर कोणीतरी हाताळत असल्याचा आरोप रूपा यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एका माध्यमाने दिलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

पोलिसांनी सुशांतच्या मृतदेहाची छायाचित्रे का हटवली आहेत. त्यांची छायाचित्रे पाहिल्यावर लोकांच्या मनात शंका आली की, त्यांच्या गळ्याभोवती असलेली खूण ही सुसाइड्ची नाही. लाखो लोक प्रश्न उपस्थित करत आहेत, मी त्यापैकी एक आहे. आत्महत्या असल्यास सामान्यत: यू आकाराची खूण असते. परंतु व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओंमध्ये आपण यु आकाराची खूण दिसत नाही.

मला आधीच शंका होती की, सुशांत आत्महत्या प्रकरणात कोणी गोष्ट तयार तर करत नाही ना. पोलिसांनी त्वरित सांगितले की, ही आत्महत्या आहे. त्यांनी म्हटले होते की, तपासणीनंतरच ते आत्महत्या आहे की हत्या आहे हे कळेल. पहिल्याच दिवसापासून काही लोक सुशांत डिप्रेशनचा रुग्ण असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही बडे लोक कथा सेट करतात. मला सांगा की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणती व्यक्ती अशी आहे जी कधीही डिप्रेशनमध्ये आली नव्हती किंवा निराश झाली नाही.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील रोज नवनवी पैलू समोर येत आहेत. असं असतांनाच रूपा गांगुली यांच्या आरोपामुळे नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सुशांतचं इन्स्ट्राग्राम अकाऊंट कोणीतरी दुसरं हाताळत होतं. तसंच पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने काही पोस्ट देखील डिलीट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असल्याचं संबंधित माध्यमाने म्हटलं आहे. यासह रूपा गांगुली यांनी देखील एक व्हिडिओ पोस्ट करत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. “सुशांतचं अकाऊंट वापरलं जात असून त्यावरून काही गोष्टी डिलीट होत आहेत, तर काही अॅड होत आहेत. हे कोणालाच माहित नाही, हे कसं होऊ शकतं? माझा आधी यावर विश्वास बसत नव्हता. मात्र मी स्वतः स्क्रीनशॉट पाहिले आहेत. सुशांतचं अकाऊंट पोलीस वापरत आहेत वा इतर कोणी? सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर याप्रकरणी सीबीआय चौकशी केली जाणार का? असे अनेक प्रश्न गांगुली यांनी उपस्थित केले आहेत.

तसेच आत्महत्येसाठी एकच कारण असू शकत नाही. सुसाइड नोटही सापडली नाही. गळ्याभोवती असलेली खूण तर संशयाच्या भोवऱ्यात आहे. मला खूप प्रश्न आहेत? पोलिसांनी ते घर सील केले की नाही? नवीन लॉक घराला लावले आहे की नाही? जुन्या लॉकच्या 50 चाव्या आढळू शकतात. मी गुप्तहेर नाही, पण जेव्हा हे प्रश्न माझ्या मनात येतात तेव्हा हे प्रश्न पोलिसांच्या मनात का येत नाहीत?

 

News English Summary: The code of actor Sushant Singh Rajput’s suicide case has not been revealed yet. Many fans are claiming that the suicide was not due to depression but due to other reasons. Similarly, senior actress and BJP leader Rupa Ganguly has made sensational allegations about Sushant’s suicide.

News English Title: Senior actress and BJP leader Rupa Ganguly has made sensational allegations about Sushant suicide News latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x