11 August 2020 8:44 PM
अँप डाउनलोड

VIDEO जम्मू: दूरदूर निर्मनुष्य दल लेक'मध्ये मोदी शूटिंग'साठी माशांना अभिवादन करत होते? नेटकरी

जम्मू : नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे त्यांच्यासोबत फोटोशूट आणि व्हिडिओशूट करणारी विशेष टीम असते हे अनेक वेळा अनुभवण्यात आले आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर मोदी गेले असता पुन्हा आला आहे. कारण मोदींची अभिवादन करण्याची स्टाइल सर्वपरिचित आहे. रविवारी नरेंद्र मोदींनी जम्मूमधील दल लेकमध्ये फेरफटका मारला. परंतु, या बोटीमधून मारलेल्या फेरफटक्यादरम्यानही नरेंद्र मोदी हात वर करुन अभिवादन करतांना दिसत होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु, हात वर करून ते नक्की कोणाला अभिवादन करत होते हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी जम्मू-काश्मीरमधील काही नेत्यांनी यासंदर्भात ट्विट करुन नरेंद्र मोदींची फिरकी घेतली आहे. कारण सदर व्हिडीओमध्ये मोदी बोटीमधून हात वर करुन अभिवादन करताना दिसत आहेत. मात्र हा ६४ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मोदी कोणाला हात दाखवत आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे. बोट चालवणारे काही सैनिक आणि बोट वगळता या व्हिडीओमध्ये काहीच दिसत नाहीय. दल लेकमध्ये फेरफटका मारताना मोदीं बोटीच्या पुढच्या भागात उभे राहून पहाणी करताना दिसतात. त्यांच्या मागे दूरवर झबरवान पर्वतरांगाही दिसत आहेत.

परंतु, अचानक मोदींनी हात वर करुन अभिवादन करण्यास सुरुवात केली. अनेक स्थानिकांनी या व्हिडीओवर कमेन्ट करुन मोदी कोणाला हात दाखवत आहेत असा प्रश्न उपस्थित केला. ‘दल लेकव आकाराने खूप मोठे आहे. त्यामुळे तलावाच्या काठाशी उभी असणारी व्यक्ती तलावातील बोटीमधून दिसत नाही. तसेच मोदी येणार म्हणून अनेक रस्ते सामान्यांसाठी बंद केले होते त्यामुळे तलावाकाठी असण्याचा प्रश्नच नाही,’ असं स्थानिकांनी ट्विटवर म्हटले आहे. विशेष म्हणजे एएनआयच्या व्हिडीओवरुन मोदी ट्रोल होत असतानाच भाजपानेही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तेथेही अनेकांनी मोदींची खिल्ली उडवली आहे.

काय आहे तो नेमका व्हिडिओ;

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x