
Tata Power Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. नुकताच ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने तीन महिन्यासाठी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स (NSE: TATAPOWER) पुढील काळात आणखी वाढू शकतात. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक 452-456 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
स्टॉक टार्गेट प्राईस
तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील तीन महिन्यात 525 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 415 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के वाढीसह 484.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉक सपोर्ट लेव्हल
मागील 6 महिन्यांपासून टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 400-460 रुपये किमतीच्या दरम्यान कन्सोलिडेशन पाहायला मिळत आहे. या स्टॉकने 440-460 रुपये रेंजमध्ये मल्टिपल सपोर्ट निर्माण केला आहे. 9 सप्टेंबर रोजी टाटा पॉवर स्टॉक 411 रुपये या इंट्राडे नीचांक किमतीवर पोहोचला होता. ऑगस्ट महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 403 रुपये ही इंट्राडे नीचांक किंमत स्पर्श केली होती.
जुलै महिन्यात या स्टॉकचा नीचांक दर 400 रुपये होता. 24 सप्टेंबर रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 475 रुपये या उचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. आज या कंपनीच्या शेअरने 484 रुपये किंमत स्पर्श केली आहे. मागील एका आठवड्यात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 6.3 टक्के वाढले आहेत. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7.4 टक्के परतावा दिला आहे.
मागील 1 वर्षात दिला 108% परतावा
मागील एका महिन्यात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 12 टक्के आणि तीन महिन्यांत 9 टक्के वाढले आहेत. मागील सहा महिन्यांत टाटा पॉवर स्टॉक 20 टक्के वाढला होता. 2024 या वर्षात हा स्टॉक 42 टक्के वाढला होता. मागील 1 आणि 2 वर्षात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 108 टक्के आणि 100 टक्के वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.