 
						Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समधे शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीचे (NSE: TATAPOWER) शेअर्स 494.85 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समधे वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे मॉर्गन स्टॅन्ले फर्मने स्टॉकची रेटिंग ‘अंडरवेट’ मधून अपग्रेड करून ‘ओव्हरवेट’ केली आहे. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 577 रुपये किमतीवर पोहोचतील. (टाटा पॉवर कंपनी अंश)
स्टॉक ब्रेकआऊट देणार
तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक सध्या 500 रुपये किमतीवर ब्रेकआऊट देण्याची तयारी करत आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के वाढीसह 484.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने या स्टॉकवर 530 रुपये टारगेट प्राईस जाहीर केली आहे.
1 वर्षात दिला 85 टक्के परतावा
शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 494.85 रुपये किमतीवर पोहोचले होते. टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 230.80 रुपये होती. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 23 टक्के वाढली आहे.
मागील 30 दिवसात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. 4 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करत होते. तेव्हा कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 2 रुपये लाभांश वाटप केला होता. टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीमध्ये टाटा सन्सचा 46 टक्के वाटा आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		