
Tata Power Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के घसरणीसह 247.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने मजबूत नफा कमावला आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 9 टक्के वाढीसह 1,017.41 कोटी रुपये नफा कमावला आहे.
टाटा पॉवर कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कंपनीचा नफा देखील वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 935.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.41 टक्के वाढीसह 251.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
टाटा पॉवर कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत 16,029,54 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 14,181.07 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने निव्वळ नफ्यात 84 टक्के वाढ नोंदवली आहे. सप्टेंबर तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा EBITDA 1,760.5 कोटी रुपयेवरून 75.5 टक्के वाढीसह 3,090.4 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर याच तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 12.5 टक्के वाढून 19.6 टक्केवर पोहचला आहे.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर ‘सेल’ रेटिंग देऊन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 220 रुपये किमतीवर घसरू शकतात. जेएम फायनान्शिअल फर्मने देखील टाटा पॉवर स्टॉकवर 230 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
नुवामा ब्रोकरेज फर्मने प्रति शेअर टाटा पॉवर स्टॉकवर 275 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर CLSA ने टाटा पॉवर स्टॉकवर ‘ सेल ‘ रेटिंग देऊन शेअरची लक्ष किंमत 205 रुपये किमतीपर्यंत कमी केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.