 
						Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 340.45 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील पाच दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 30 टक्के वाढवले आहे. आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.47 टक्के घसरणीसह 336.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा पॉवर कंपनीचे शेअर मजबूत वाढीमुळे ओव्हरबॉट झोनमध्ये ढकलला गेला आहे. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सच्या टेक्निकल चार्टवर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 82.2 अंकावर आहे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 335.80 रुपये किमतीवर पोहचला होता. 6 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 298.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 2 महिन्यांत टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 230 रुपये किमतीवरून वाढून 335 रुपये किमतीवर पोहचले होते. ओव्हरबॉट झोन आणि किंचित एकत्रीकरणाने पुढील काही दिवसांत टाटा पॉवर कंपनीच्या वरील दबाव कमी होण्यास मदत होईल. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक काही दिवसात 380 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या लक्षणीय व्हॉल्यूमसह राऊंडिंग बॉटम पॅटर्न ब्रेकआउट तयार करून सर्वकालीन उच्च पातळीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग अॅव्हरेज 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या EMA वर ट्रेड करत आहे. MACD इंडिकेटर नुसार टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 420 रुपये किंमत देखील ओलांडू शकतात.
टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कंपनीने बुधवारी निवेदन जाहीर केले की, त्यांनी 13.2 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा करार केला आहे. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कंपनीने डॉ अभय फिरोदिया ग्रुप ऑफ कंपनीच्या फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीसोबत हा करार केला आहे. यासह टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कंपनीने जया हिंद इंडस्ट्रीज कंपनी सोबत देखील कारार केला आहे. या करारांतर्गत टाटा पॉवर कंपनी सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीने ‘ग्रुप कॅप्टिव्ह’ खरेदी केले आहेत. म्हणजेच टाटा समूह आपल्या उपकंपन्यांच्या करारा अंतर्गत पुढील 25 वर्षांसाठी हरित वीज निर्मिती पुरवठ्यासाठी डॉ अभय फिरोदिया ग्रुप ऑफ कंपनीजच्या फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीसोबत आणि जया हिंद इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत वीज पुरवठा करार करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		