 
						Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने 333.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तज्ञांच्या मते पुढील काही वर्षांमध्ये ऊर्जा निर्मिती क्षेत्रात जोरदार वाढ पाहायला मिळणार आहे. यामुळे ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठ्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत.
भारत सरकारने 2031-32 सालापर्यांत 80 GW नवीन औष्णिक उर्जा क्षमता आणि 321 GW नवीन अक्षय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. टाटा पॉवर कंपनीने 2030 पर्यंत आपल्या अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये एकूण पोर्टफोलिओच्या तुलनेत 70 टक्के वाढ करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. सध्या हा शेअर (18 डिसेंबर 2023) 1.22% रुपये वाढीसह 337 रुपयांवर ट्रेड करत आहे.
यासाठी कंपनीने वार्षिक 1.5-2 GW अक्षय ऊर्जा क्षमता सध्या करण्यासाठी योजना आखली आहे. टाटा पॉवर कंपनीने आपल्या महसूल, EBITDA, PAT मध्ये पुढील 3 वर्षांत दुप्पट वाढीचे लक्ष्य जाहीर केले आहे. टाटा पॉवर कंपनीच्या मते, कंपनी आपले निर्धारित लक्ष आर्थिक वर्ष 2027 पर्यंत सध्या करेल.
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा पॉवर कंपनीच्या शेअरवर 390 रुपये सुधारित टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आर्थिक वर्ष 2025/ आर्थिक वर्ष 2026 पर्यंत अनुक्रमे 2.8x / 2. 4x पट वाढू शकतात. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 333.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
14 डिसेंबर रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 341.30 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,06,468.71 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 335.84 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		