
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 16 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 228.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 447.70 रुपये या उच्चांक किमतीवर पोहोचला होता. हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमतीवरून 93 टक्के वाढला आहे. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.41 लाख कोटी रुपये आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
16 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 228.10 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 470.85 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचला होता. 2024 या वर्षात टाटा पॉवर स्टॉकची किंमत 35 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 89 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.42 टक्के वाढीसह 419.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा पॉवर स्टॉकचा RSI 48 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांपेक्षा सिंपल मुविंग एव्हरेजच्या वर आणि 5 दिवसांच्या SMA च्या खाली ट्रेड करत आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकने 435 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
तज्ञांनी हा स्टॉक 420 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 535 ते 550 रुपये किमतीवर जाऊ शकतो. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक पुढील काळात 495-522 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकने 442 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
StoxBox फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक पुढील काळात 520 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ऑक्टोबर 2023 च्या मधील नीचांक किंमत पातळीपासून हा स्टॉक 100 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे. तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकमध्ये गुंतवणूक करतमा 441 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. SAMCO सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकचा RSI 62 वर आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकला 475 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. जर या स्टॉकने प्रतिकार पातळीवर ब्रेकआऊट दिला तर शेअर अल्पावधीत 500 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.