 
						Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2.5 टक्के वाढीसह 348.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 69 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या एका वर्षाच्या कालावधीत पॉवर सेक्टरची सरासरी वाढ 94 टक्के होती. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटींच्या पार गेले आहेत. आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 2.27 टक्के वाढीसह 354.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अनेक ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अॅटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकची टारगेट प्राइस वाढवली आहे. ब्रोकरेजला फर्मला विश्वास आहे की टाटा पॉवर स्टॉक पुढील काळात चांगली कामगिरी करू शकतो. भारतातील दिग्गज ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 450 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. ही टार्गेट प्राइस शेअर्सच्या सध्याच्या किंमतीपेक्षा 30 टक्के जास्त आहे.
तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनी आर्थिक वर्ष 2024 मध्ये 34 अब्जच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 100 अब्ज EBITDA नोंदवू शकते. टाटा पॉवर कंपनीची ऊर्जा निर्मिती क्षमता 4.3 GW आहे. यामधे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, आणि संकरित ऊर्जेचा समावेश आहे. टाटा पॉवर कंपनी आर्थिक वर्ष 2030 पूर्वी 10 GW ऊर्जा निर्मिती क्षमता जोडण्याची योजना आखत आहे. यासाठी टाटा पॉवर कंपनी 600 अब्ज रुपये भांडवली खर्च करणार आहे.
टाटा पॉवर कंपनी तामिळनाडू राज्यात गुंतवणूक करणार आहे. टाटा पॉवर कंपनीने मंगळवारी माहिती दिली की, टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड तामिळनाडू राज्यात अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 70,800 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		