
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 2 टक्के वाढीसह 1,076 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 1,052 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
टाटा पॉवर कंपनीने डिसेंबर तिमाहीत 14,841 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 14,339 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2.54 टक्के घसरणीसह 382.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर 2023 या काळात टाटा पॉवर कंपनीने 3,235 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीने 2,871 कोटी रुपये नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत कंपनीने 45,286 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत टाटा पॉवर कंपनीची अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता 4270 मेगावॅट नोंदवली गेली होती.
टाटा पॉवर कंपनीच्या सीईओ ने निवेदन जाहीर करून माहिती दिली की, “कंपनीचे मुख्य व्यवसाय उत्तम प्रदर्शन करत आहेत. टाटा पॉवर कंपनी मागील 17 तिमाहीपासून निव्वळ नफा कमावत आहे”. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती.
शुक्रवारी या कंपनीच्या शेअरने 413 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मात्र प्रॉफिट बुकिंगमुळे स्टॉक 392.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात मजबूत तेजीत वाढेल. अँटिक ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर 450 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.