 
						Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स कंपनीने छत्तीसगड राज्यात राजनांदगाव येथे 120 मेगावॅट क्षमतेचा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि 100 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण केला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टाटा पॉवर सोलर सिस्टीम कंपनीला डिसेंबर 2021 मध्ये सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडतर्फे इंजिनीअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन आधारावर 945 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते.
या प्रोजेक्ट अंतर्गत कंपनीला अभियांत्रिकी, डिझाइन, पुरवठा, बांधकाम, चाचणी, ऑपरेशन आणि देखभाल आणि प्रकल्प सुरू करणे यासंबंधात काम देण्यात आले आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.21 टक्के वाढीसह 376.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स कंपनीने छत्तीसगड राज्यात राजनांदगाव येथे भारतातील सर्वात मोठा सोलर आणि बॅटरी ऊर्जा संचयन प्रणाली प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केला आहे. या प्रोजेक्टमध्ये 120 मेगावॅट क्षमतेची बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली बसवण्यात आली आहे. आणि 100 मेगावॅट क्षमतेचा सौर पीव्ही प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प 24×7 हरित उर्जा पुरवठा करेल आणि नाविन्यपूर्ण उपायांद्वारे अक्षय उर्जेच्या विस्ताराला गती देईल. या प्रकल्पातून वार्षिक 24.35 कोटी युनिट वीज निर्माण केली जाणार आहे. या प्रोजेक्टमुळे पुढील 25 वर्षांत कार्बन उत्सर्जन 48.7 लाख टन कमी होईल.
टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के घसरणीसह 396.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अँटिक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी टाटा पॉवर स्टॉकवर 450 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. 28 मार्च रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 18245 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 433.20 रुपये होती.
मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 95 टक्के परतावा कमावून दिला आहे. डिसेंबर तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 1076.12 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1,052.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		