
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.40 लाख कोटी रुपये आहे. केअर रेटिंग्स फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची रेटिंग अपग्रेड केली आहे. केअर एजन्सीने टाटा पॉवर स्टॉकची रेटिंग ‘CARE AA, Positive’ वरून ‘CARE AA+ स्थिर’ अशी अपग्रेड केली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
शुक्रवारी टाटा पॉवर कंपनीचे एकूण 1.25 लाख शेअर्स ट्रेड झाले होते, त्याचे एकूण मुल्य 5.54 कोटी रुपये होते. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.09 टक्के घसरणीसह 438.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2024 या वर्षात टाटा पॉवर स्टॉक 34 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 96 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा पॉवर स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 52.1 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही.
टाटा पॉवर स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुविंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 215.65 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 464.30 रुपये होती.
केअर फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या दीर्घकालीन बँक सुविधा आणि 1,585 कोटी रुपयेच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरमुळे स्टॉक रेटिंगमध्ये सुधारणा केली आहे. व्याज, भाडे, घसारा आणि कर, निव्वळ कर्ज, नफा यातील सुधारणा कंपनीच्या आर्थिक कामगिरीमधील सातत्यपूर्ण सुधारणेला चालना देत आहे. टाटा समूहाकडे मोठ्या कॅपेक्स योजना असून, निव्वळ कर्ज, पीबीआयएलडीटी मध्यम कालावधीत एकत्रित स्तरावर 4 पट कमी राहण्याची अपेक्षा आहे. शिवाय, टाटा समूहाच्या धोरणात्मक योजनांमुळे रेटिंगमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
मार्च 2024 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 11 टक्क्यांच्या वाढीसह 1,046 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मार्च 2023 तिमाहीत या कंपनीने 939 कोटी रुपये नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 16,463.94 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 13,325.30 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टाटा पॉवर कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 3,810 कोटी रुपयेवरून 4,280 रुपयेवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये टाटा पॉवर कंपनीने 56,547.10 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 2023-24 मध्ये कंपनीने 63,272.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.