
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर स्टॉक शुक्रवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 446.20 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी टाटा पॉवर सोलर सिस्टम्स लिमिटेडने बँक ऑफ इंडियासोबत रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन्स आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी सुलभ वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने करार केला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
टाटा पॉवर सोलर ही सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी वित्तपुरवठा करण्यासाठी बँक ऑफ इंडियासोबत करार करणारी भारतातील पहिली सौर ऊर्जा कंपनी ठरली आहे. या भागीदारीद्वारे, ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी देखील वित्तपुरवठा केला जाणार आहे. शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 5.11 टक्के वाढीसह 445 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
बँक ऑफ इंडियासोबतच्या या भागीदारीद्वारे टाटा पॉवर सोलर कंपनी रूफ टॉप सौर प्रतिष्ठापनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या धोरणांना पाठिंबा देणार आहे. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. 26 जुलै 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 221.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 26 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 446.20 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.
2024 या वर्षात टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 35 टक्केपेक्षा जास्त मजबूत झाले होते. मागील 4 वर्षांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के नफा कमावून दिला आहे. 24 जुलै 2020 रोजी टाटा पॉवर स्टॉक 48.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 464.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 220 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.