 
						Tata Power Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 4.77 टक्क्यांच्या तेजीसह 356.15 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी टाटा पॉवर कंपनी शेअर 339.95 रुपायंवर बंद झाला होता. दरम्यान, टाटा पॉवर लिमिटेड कंपनी डिसेंबर तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. त्यामुळे टाटा पॉवर कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे.
टाटा पॉवर कंपनीने काय अपडेट दिली
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले आहे की, ‘डिसेंबर तिमाहीच्या लेखापरीक्षण केलेल्या आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांची बैठक पार पडणार आहे. कंपनीने दिलेल्या या माहितीनंतर टाटा पॉवर कंपनी शेअर्समध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
टाटा पॉवर इन्व्हेस्टमेंट्स
डिसेंबर महिन्यात टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने भूतानमध्ये मोठी गुंतवणूकीची घोषणा केली होती. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे सीईओ प्रवीर सिन्हा यांनी भूतानच्या खोर्लोचू जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाल्याची माहिती दिली होती आणि त्यासाठी ६,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे असं म्हटलं होतं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व भूतानमधील खोलोंगचू नदीवरील ६०० मेगावॅटचा हा प्रकल्प सप्टेंबर २०२९ पर्यंत कार्यान्वित होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
टाटा पॉवर कंपनी शेअर टार्गेट प्राईस
टॉप ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने टाटा पॉवर कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 509 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. त्यामुळे लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून टाटा पॉवर शेअर मालामाल करू शकतो.
सुमारे 1.46 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०३० पर्यंत आपली परिचालन क्षमता ३२ गिगावॅटपर्यंत वाढविण्यासाठी सुमारे १.४६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये टाटा पॉवर लिमिटेड कंपनीची स्थापित क्षमता १५.६ गिगावॅट होती, तर अक्षय ऊर्जा ६.७ गिगावॅट होती.
टाटा पॉवर शेअरने किती परतावा दिला
मागील १ महिन्यात टाटा पॉवर शेअर 16.30% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 18.94% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा पॉवर शेअर 0.77% घसरला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर शेअरने 478.64% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये टाटा पॉवर शेअरने 3,391.67% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		