
Tata Steel Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला (NSE: TATASTEEL) मिळाली होती. शुक्रवारी शेअर बाजार बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले होते. शुक्रवारी दिवसभरात आयटी, इन्फ्रा, फार्मा तसेच एनर्जी शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून (Gift Nifty Live) आली होती. शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 रोजी हा शेअर 0.74 टक्के वाढून 144.45 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील कंपनी अंश)
टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर ६ महिन्यांतील उच्चांकी पातळीवरून २२ टक्क्यांनी घसरला आहे. १८ जून २०२४ रोजी टाटा स्टील शेअरने १८४.६० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. टाटा स्टील शेअर ६ महिन्यांत १३ टक्के, ३ महिन्यांत ९ टक्के आणि १ महिन्यात ३% घसरला आहे. मागील वर्षभरात टाटा स्टील शेअर १३ टक्क्यांनी वाढला आहे. आता ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राइस
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरसाठी १८० रुपये टार्गेट प्राईस सह ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. सेंट्रम ब्रोकिंग फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी १६८ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Axis सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी १७५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॉर्गन स्टॅन्ली ब्रोकरेज फर्मनेने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी १७५ रुपये टार्गेट प्राईससह ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे.
टाटा स्टील शेअर चार्टवरील संकेत
टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) 45.3 वर पोहोचला आहे, म्हणजे शेअर ‘ओव्हरबॉट’ किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नसल्याचे संकेत आहेत. टाटा स्टील शेअरमध्ये एक वर्षाचा बीटा १.५ आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरतेचा संकेत देतो. टाटा स्टील कंपनी शेअर 5 दिवस, 10 दिवसांच्या उच्चांकी पातळीवर ट्रेड करत आहे, परंतु 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग ऍव्हरेजच्या खाली आहे, जे दर्शविते की टाटा स्टील शेअर मंदीच्या झोनमध्ये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.