12 December 2024 12:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, फायदा घ्या

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. गुरुवारी हा स्टॉक 2 टक्केपेक्षा जास्त वाढून 168.90 रुपये किमतीवर पोहचला होता. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )

जून 2024 तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 75 टक्क्यांच्या वाढीसह 918.57 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. व्यावसायिक खर्चात कपात झाल्यामुळे टाटा स्टील कंपनीला जबरदस्त नफा झाला आहे. 2023-24 च्या एप्रिल-जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 524.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.86 टक्के घसरणीसह 158.39 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 55,031.30 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 60,666.48 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीचा खर्च 58553.25 कोटी रुपयेवरून कमी होऊन 52,389.06 कोटी रुपयेवर आला होता. दरम्यान टाटा स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या पूर्ण मालकीची उपकंपनी TPPL मधील 26 टक्के भागभांडवल संपादन करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत TPRE कंपनी 35 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.

टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनी TPPL सोबत शेअर खरेदी करार करून 26 टक्के भाग भांडवल संपादन करणार आहे. टाटा स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षांत नीलाचल इस्पात निगम लिमिटेड या उपकंपनीचे इक्विटी शेअर्स खरेदी करून 6,000 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. ग्लोबल ब्रोकरेज CLSA ने टाटा स्टील स्टॉकवर 135 रुपये टार्गेट प्राइस निश्चित करून ‘अंडरपरफॉर्म’ रेटिंग जाहीर केली आहे.

जेफरीजने टाटा स्टील स्टॉकवर 195 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 2024 या वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 300 टक्के वाढली आहे. टाटा स्टील कंपनीमध्ये एलआयसीने 95,25,31,650 शेअर म्हणजेच 7.63 टक्के भागभांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 03 August 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x