
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 184 रुपये होती. या किमतीवरून हा स्टॉक 15 टक्क्यांनी घसरला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
या स्टॉकमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, चिनी बाजारपेठेतून स्वस्त दरात पोलाद निर्यात होत आहे. जागतिक बाजारातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मेटल कंपन्यांचे शेअर्स दबावाखाली व्यवहार करत आहेत. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.94 टक्के वाढीसह 151.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
बुधवारी टाटा स्टील स्टॉक 1.80 टक्क्यांच्या वाढीसह 153 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 18 जून रोजी टाटा स्टील स्टॉक 184.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून शेअरची किंमत 15 टक्क्यांनी घसरली आहे. जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात 75 टक्के वाढ नोंदवली आहे. या काळात कंपनीने 918.57 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 524.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 180 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ज्ञांनी टाटा स्टील स्टॉक किमान 4-6 महिन्यांचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 180-185 रुपये किमतीवर जाऊ शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेअर बाजारातील 12 तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकमध्ये तेजीची शक्यता व्यक्त केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 190 रुपये टार्गेट प्राइसवर सामूहिक सहमती दर्शवली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.