
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 179.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.25 टक्के वाढीसह 181.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )
नुकताच नेदरलँड्सने टाटा स्टील कंपनीच्या प्लांटचे ग्रीन ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी 326 कोटी डॉलर्स अनुदान देण्याची घोषणा केली आहे. टाटा स्टील कंपनीने प्रस्तावित डीकार्बोनायझेशन रोडमॅपबाबत डच सरकारसोबत चर्चा सुरू केली आहे. मार्च 2024 मध्ये डच संसदेने सरकारला टाटा स्टील नेदरलँड्स प्लांटच्या डिकार्बोनायझेशनच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. टाटा स्टील कंपनीने आपल्या शेअरधारकांना प्रति इक्विटी शेअर 3.60 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
टाटा स्टील कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2023-24 साठी शेअरधारकांना 1 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर 360 टक्के म्हणजेच 3.60 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटपासाठी या कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 21 जून 2024 हा दिवस निश्चित केला आहे. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी असताना 178 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 187 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील सहा महिन्यांत टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 7.06 टक्के वाढवले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.