 
						Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून टाटा स्टील स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 15-35 टक्क्यांनी कमजोर झाले होते. ( टाटा स्टील कंपनी अंश )
टाटा सन्सच्या आयपीओमुळे टाटा समूहातील काही कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले आहेत. यामधे टाटा स्टील स्टॉक देखील सामील आहे. टाटा समूहाचा भाग असलेली सर्वात मोठी कंपनी TCS मध्ये ब्लॉक डीलमुळे घसरण पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 3.02 टक्के वाढीसह 150.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टाटा सन्सची विविध कंपनीमधील गुंतवणूक 35 टक्के पेक्षा कमी आहे. टाटा टेकमध्ये टाटा सन्स कंपनीने 28 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. टाटा केमिकल्स कंपनीमध्ये टाटा सन्सने 25 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. Tata Elxsi कंपनीमध्ये टाटा सन्सचा वाटा 20 टक्के आहे. आणि टाटा मोटर्स कंपनीमध्ये टाटा सन्सचा वाटा 13 टक्के आहे. टाटा पॉवर कंपनीमध्ये टाटा सन्सचा वाटा 12 टक्के पेक्षा कमी आहे. तर टाटा कंज्युमर कंपनीमध्ये टाटा सन्सचा वाटा 12 टक्के आणि इंडियन हॉटेल कंपनीमध्ये 10 टक्के आहे.
तज्ज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, डिमर्जर आहे. टाटा मोटर्स कंपनीने मे महिन्याच्या सुरुवातीला डिमर्जरची घोषणा केली होती. आणि आपले ईव्ही आणि प्रवासी वाहन व्यवसाय स्वतंत्रपणे सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. या डिमर्जरमुळे कंपनीच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही असे कंपनीने म्हंटले आहे.
कर्मचारी, ग्राहक आणि भागीदार, तसेच शेअरधारकांची दोन्ही कंपन्यांमध्ये समान हिस्सेदारी असेल. या कंपनीचे 3 ऑटोमोटिव्ह युनिट्स स्वतंत्रपणे काम करणार आहेत. या डिमर्जरमुळे शेअरधारकांची होल्डींग वाढेल. काही दिग्गज तज्ञांनी टाटा टेक कंपनीची रेटिंग डाउनग्रेड केल्याने शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		