
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 151.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा स्टॉक किंचित वाढीसह क्लोज झाला होता. 11 मार्च 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 159.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.90 टक्के वाढीसह 151.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( टाटा स्टील कंपनी अंश )
शेअर बाजारातील तज्ञांनी, टाटा स्टील स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 225 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक हळूहळू मात्र निश्चितपणे 200-225 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. टाटा स्टील स्टॉक आपल्या मूव्हिंग सरासरीच्या किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 200-225 रुपये टार्गेट साठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. प्रोग्रेसिव्ह शेअर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 193 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तर टिप्स ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 169 रुपये किमतीवर जाऊ शकतात.
टाटा स्टील कंपनीने आपल्या संचालक मंडलच्या बैठकीत डिबेंचरच्या माध्यमातून 2700 कोटी रुपये भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरच्या वाटपाची तारीख 27 मार्च 2024 निश्चित केली आहे, आणि त्याची मॅच्युरिटी तारीख 26 मार्च 2027 असेल.
टाटा स्टील कंपनी जागतिक पातळीवरील पोलाद निर्मिती करणाऱ्या अग्रणी कंपन्यांमध्ये सामील आहे. या कंपनीची कच्चा पोलाद निर्मिती क्षमता वार्षिक 35 दशलक्ष टन होती. नुकताच टाटा स्टील कंपनीने ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट प्लांटमध्ये कोक ओव्हनचे कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.