Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या

Tata Steel Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने 170 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यानंतर या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली होती. दिवसाअखेर टाटा स्टील स्टॉक एक टक्क्यांच्या घसरणीसह 165.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टाटा स्टील कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 177 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 167.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा स्टील स्टॉक खरेदी करताना 164 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील आर्थिक वर्षात भारताची स्टील आयात 38 टक्क्यांच्या वाढीसह 83.19 लाख टनांवर पोहोचली आहे. तज्ञांच्या मते, चालू आर्थिक वर्षात भारतात स्टीलचा वापर आठ ते दहा टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. देशातील पोलाद उत्पादक कंपन्या चीनसह काही देशांकडून केल्या जाणाऱ्या आयातीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. देशातील पोलाद उत्पादक कंपन्यांनी स्टील आयातीच्या मुद्द्यावर सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

भारतातील पोलाद उत्पादक कंपन्या स्टील आयातीवर अंकुश ठेवण्याची आणि अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार करण्याच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची विनंती करत आहेत. भारताचे कच्चे स्टीलचे उत्पादन आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 126 दशलक्ष टन होते. जे 2024-25 या आर्थिक वर्षात 14 टक्के वाढीसह 144 दशलक्ष टनांपर्यत वाढण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 29 April 2024.