
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स नुकताच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या IPO शेअरची इश्यू किंमत 500 रुपये होती. टाटा टेक्नोलॉजी कंपनीचे IPO शेअर्स 140 टक्क्यांच्या वाढीसह 1200 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले आहेत. त्यांनतर काही वेळात या कंपनीचे शेअर्स 1400 रुपयेवर पोहचले होते. स्टॉक लिस्टिंगनंतर प्रॉफिट बुकिंग सुरू झाल्याने टाटा टेक्नोलॉजी स्टॉक 1313 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीसह ट्रेड करत होते.
आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी टाटा टेक्नोलॉजी स्टॉक 6.93 टक्के घसरणीसह 1,222 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा टेक्नोलॉजी कंपनीचा IPO जवळपास 80 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
आनंद राठी फर्मचे मत :
आनंद राठी फर्मने टाटा टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे व्यवसाय मॉडेल मजबूत असून दीर्घ मुदतीत कंपनी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
चॉईस ब्रोकिंग फर्मचे मत :
या फर्मने टाटा टेक्नोलॉजी स्टॉकवर नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. अल्पकालीन गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरमध्ये नफा बुक करावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
मेहता इक्विटीज फर्मचे मत :
या फर्मने टाटा टेक्नोलॉजी स्टॉक पडझडीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारानी आपले अर्धे शेअर्स विकून नफा बूक करावा, आणि उर्वरित शेअर्स दीर्घ मुदतीसाठी होल्ड करावे. यासह तज्ञांनी टाटा टेक कंपनीचे शेअर्स पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट फर्मचे मत :
या फर्मने गुंतवणुकदारांना स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ स्टॉक वाटप मिळाले आहेत, त्यांना तज्ञांनी स्टॉक दीर्घकाळ होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.