
Tata Technologies Share Price | स्टॉक मार्केट सेन्सेक्स,मधील टॉप १० कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात १.१३ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. यामध्ये भारती एअरटेल लिमिटेड कंपनीला सर्वाधिक फायदा झाला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल लिमिटेड, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस लिमिटेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)
टाटा टेक्नॉलॉजीज शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 0.47 टक्के घसरून 937.55 रुपयांवर पोहोचला होता. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 1,284.80 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 931 रुपये होता. सध्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 38,033 कोटी रुपये होती.
टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये
स्टॉक टेक्निकल चार्टनुसार टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) २९ आहे, ज्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. टाटा टेक्नॉलॉजीज शेअरच्या आऊटलूकवर स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज शेअर टार्गेट प्राईस
सेबीचे नोंदणीकृत विश्लेषक ए. आर. रामचंद्रन म्हणाले की, ‘टाटा टेक्नॉलॉजीज शेअर सध्या मंदीत आहे, पण डेली चार्टवर थोडा ‘ओव्हरसोल्ड’ आहे. नजीकच्या काळात टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ११२० रुपयांची टार्गेट प्राईस गाठू शकतो ए. आर. रामचंद्रन यांनी म्हटलं आहे. तसेच नवीन गुंतवणूकदारांनी हा शेअर ९९७ रुपयांच्या पातळीवर जाईल तेव्हाच खरेदी करावी असा सल्ला देखील दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.