 
						TCS Employee Transfer | टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या अडचणी वाढू शकतात. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सीनेटने (NITES) टीसीएसविरोधात कामगार आणि रोजगार मंत्रालयात तक्रार दाखल केली आहे.
टीसीएस आपल्या दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. NITES ने कामगार मंत्रालयाला संभाव्य कामगार संहितेच्या उल्लंघनाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर टीसीएसवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नव्या नियमांचे आवाहन
आयटी कर्मचाऱ्यांच्या अनैतिक बदल्यांबाबत नवीन धोरणे आणि नियम तयार करावेत, अशी विनंतीही आम्ही मंत्रालयाला करतो, असे NITES चे हरप्रीत सिंग यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. १५ नोव्हेंबरच्या तक्रारीनुसार, या सक्तीच्या बदल्यांमुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. NITES ने सांगितले की, त्यांना कर्मचाऱ्यांच्या 180 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
टीसीएसच्या एका अधिकाऱ्याने मिंटला सांगितले आहे की, या बदल्या नियमित आहेत. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. बदल्यांबाबत टीसीएसच्या पत्रात स्पष्टता नसल्यावरही NITES ने भर दिला आहे. यापूर्वी टीसीएसवर नवीन नियुक्त्यांना उशीर केल्याचा आरोप केला होता आणि बाधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.
Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		