 
						TCS Employees Resignations | देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सध्या एका नव्या समस्येला सामोरे जात आहे. कोविड-19 पासून सुरू झालेले वर्क फ्रॉम होम आयटी कंपनीने संपवले आहे. 3 वर्षांनंतर मोठ्या संख्येने कर्मचारी या बदलाबाबत समाधानी नाहीत. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम संपल्यानंतर राजीनामा सत्र सुरु झाल्याने कंपनीच्या मॅनेजमेन्ट मध्ये काळजी वाढली आहे.
टीसीएसचे वर्क फ्रॉम होम संपल्याने महिला कर्मचाऱ्यांचे वारंवार राजीनामे होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कोविड-19 च्या वेळी कंपनीने वर्क फ्रॉम होमचे धोरण आणले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते संपवण्याची चर्चा जोरात सुरू होती.
टीसीएसचे एचआर प्रमुख मिलिंद लक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्क फ्रॉम होम संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी अधिक राजीनामे दिले आहेत. मिलिंद यांचे म्हणणे आहे की, राजीनाम्यामागे इतरही कारणे असू शकतात. पण हे पहिलं कारण वाटतं. मिलिंद म्हणतात की, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे राजीनामे कमी असतात. पण हा आकडा आता पुरुषांच्या पुढे गेला आहे.
टीसीएसमध्ये सुमारे 6,00,000 कर्मचारी आहेत. ३५ टक्के महिला कर्मचारी आहेत. गेल्या आर्थिक वर्षात टीसीएसच्या २० टक्के कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		