5 May 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा
x

Urja Global Share Price | ऊर्जा ग्लोबल शेअरमध्ये बंपर तेजी, 5 दिवसात 32 टक्के परतावा दिला, 12 रुपयाचा शेअर खरेदी करणार?

Urja Global Share Price

Urja Global Share Price | उर्जा ग्लोबल लिमिटेड या बॅटरी आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीत ट्रेड करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के अपर सर्किटसह 12.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर उर्जा ग्लोबल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 10.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

उर्जा ग्लोब कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी एका डीलमुळे पाहायला मिळत आहे. कार बॅटरीचे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीने टेस्ला पॉवर यूएसए कंपनीसोबत व्यापारी करार केला आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.69 टक्के घसरणीसह 11.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

उर्जा ग्लोबल ही कंपनी टेस्ला पॉवर ब्रँड अंतर्गत बॅटरी बनवणार आहे, अशी माहिती उर्जा ग्लोबल लिमिटेडने सेबीला दिली आहे. उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीने टेस्ला पॉवर कंपनीसोबत 7 जून 2023 रोजी व्यापारी करार केला आहे. या करारांतर्गत टेस्ला पॉवर यूएसए ब्रँड अंतर्गत उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनी बॅटरीचे उत्पादन आणि पुरवठा करणार आहे. उर्जा ग्लोबल ही कंपनी टेस्ला पॉवर कंपनीची भारतातील बॅटरी निर्माण करणारी सर्वात मोठी पुरवठादार भागीदार असेल.

उर्जा ग्लोबल कंपनीचे शेअर्स मागील 5 दिवसात 32 टक्के मजबूत झाले आहेत. टेस्ला पॉवर यूएसए कंपनीसोबत बॅटरीचे उत्पादन आणि पुरवठा करण्याच्या करारानंतर उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील 5 दिवसात 32 टक्के पेक्षा जास्त मजबूत झाले आहेत.

6 जून 2023 रोजी उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 12.74 रुपये किमतीवर पोहोचले होते. उर्जा ग्लोबल कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. उर्जा ग्लोबल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 14.85 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Urja Global Share Price today on 13 June 2023.

हॅशटॅग्स

#Urja Global Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x