1 May 2024 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा? RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर? Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा? Nippon India Mutual Fund | महिना SIP बचतीतून करोडमध्ये परतावा देत आहेत 'या' 8 योजना, पैशाने पैसा वाढवा Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी
x

TCS Share Price | TCS शेअर्स पुन्हा उच्चांकी किमतीवर जाऊ शकतात, तज्ज्ञांना स्टॉकच्या मजबूत कामगिरीबद्दल विश्वास

TCS Share Price

TCS Share Price | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने शुक्रवारी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने मार्च तिमाहीत 12,434 कोटी रुपये एकत्रित नफा कमावला आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )

मागील वर्षी कंपनीने 11,392 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच कंपनीच्या निव्वळ नफ्यात 9 टक्के वाढ झाली आहे. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 4,003.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मार्केटस्मिथ इंडिया फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मूल्यांकन थोडे जास्त आहे, मात्र या मार्च तिमाहीच्या आकड्यांनुसार कंपनीच्या स्टॉकचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे आहे. तज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात टीसीएस स्टॉक मजबूत कामगिरी करेल. मागील काही महिन्यांपासून टीसीएस कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र मार्च तिमाहीच्या निकालामुळे कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा आपल्या उच्चांक किमतीवर जाऊ शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

टीसीएस कंपनीने शुक्रवारी आपल्या मार्च तिमाहीच्या निकालासोबत गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. टीसीएस कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मार्च तिमाहीसाठी 28 रुपये अंतिम लाभांश वाटप करणार आहे. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत टीसीएस कंपनीने 61,237 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 3.5 टक्के आणि तिमाही आधारावर 2.2 टक्के वाढ झाली आहे. मार्च तिमाहीत टीसीएस कंपनीचा नफा वार्षिक आधारे 9.1 टक्के वाढीसह 12,434 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price NSE Live 13 April 2024.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x