3 May 2024 10:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Suzlon Share Price | शेअरची किंमत 36 रुपये! मजबूत ऑर्डरबुक आणि एक सकारात्मक बातमी येताच सुझलॉन शेअर्स पुन्हा तेजीत

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने मंगळवारी 19 डिसेंबर 2023 रोजी आरईसी या सरकारी कंपनीसोबत करार केल्याची घोषणा केली होती. या कराराअंतर्गत REC कंपनी सुझलॉन एनर्जी कंपनीला लागणाऱ्या खेळत्या भांडवलाची पूर्तता करणार आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या निवेदनात जाहीर केले की, REC कंपनी सोबतच्या कराराअंतर्गत मिळणारा निधी कंपनीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी, विद्यमान ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी आणि भविष्यातील ऑर्डरचे काम हाताळण्यासाठी खर्च केला जाईल.

सुझलॉन एनर्जी ही भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे. मंगळवारी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.79 टक्के घसरणीसह 37.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.51 टक्के वाढीसह 36.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 9 टक्के कमजोर झाली आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 163.51 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्याच्या किमतीचा विचार केला तर तुम्हाला समजेल की, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 14.77 टक्के खाली ट्रेड करत आहेत.

मागील महिन्यात अनेक म्युच्युअल फंड संस्थांनी सुझलॉन एनर्जी कंपनीमधील आपले शेअर्स विकून नफा वसुली केली आहे. मागील महिन्यात अनेक म्युचुअल फंड कंपन्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे 1,090 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स विकून नफा वसुली केली आहे. तर सप्टेंबर 2023 तिमाहीत विविध म्युच्युअल फंड कंपन्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक केली होती.

म्युच्युअल फंडांनी जून 2023 तिमाहीमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे 0.74 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. त्यानंतर हे प्रमाण सप्टेंबर 2023 तिमाहीच्या शेवटी 4.70 टक्केवर पोहचले होते. सध्या सुझलॉन एनर्जी कंपनी मध्ये विविध 18 म्युच्युअल फंड योजनाचे पैसे गुंतवणूक करण्यात आले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 21 December 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x