 
						TCS Share Price | टीसीएस या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीबाबत नवीन अपडेट येत आहे. नुकताच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या शाश्वत उपक्रमांना चालना देण्यासाठी, नागरी आणि संरक्षण एरोस्पेस, सेवा आणि उर्जा प्रणालींमध्ये विशेषज्ञ असलेल्या रोल्स-रॉइस या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीसोबत सहकार्य करार केला आहे. ( टीसीएस कंपनी अंश )
या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे हायड्रोजन इंधन प्रणाली तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणार आहेत. भविष्यात शून्य-कार्बन विमान इंधन म्हणून हायड्रोजनची क्षमता प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने या दोन्ही कंपन्यांनी हातमिळवणी केली आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी टीसीएस स्टॉक 0.41 टक्के वाढीसह 4,304.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
टीसीएस आणि RollsRoyce या दोन्ही कंपन्या अभियांत्रिकी कौशल्ये क्षेत्रात सहाय्य प्रदान करणार आहे. यामाध्यमातून दोन्ही कंपन्या विमानात वापरले जाणारे हायड्रोजन इंधन संबंधित तीन मुख्य समस्या जसे की इंधन ज्वलन, इंधन वितरण आणि इंजिनसह इंधन प्रणाली एकत्रीकरण यावर उपाय शोधणार आहेत.
टीसीएस ही कंपनी 2010 पासून Rolls-Royce सोबत डिझाइन, उत्पादन अभियांत्रिकी, नियंत्रण प्रणाली आणि सॉफ्टवेअर, आफ्टर-मार्केट सेवा आणि माहिती तंत्रज्ञान सेवांवर काम करत आहे. टीसीएस कंपनीने रोल्स-रॉइस कंपनीला महत्त्वपूर्ण नागरी आणि व्यावसायिक विमान वाहतूक प्रकल्पांसाठी मदत केली होती. टीसीएस कंपनीने रोल्स रोईस कंपनीला त्याच्या एंड-टू-एंड उत्पादन विकास लाइफसायकलला देखील समर्थन दिले आहे.
टीसीएस स्टॉक सोमवारी 4,295.05 रुपये किमतीवर ओपन झाला होता. दिवसभरात हा स्टॉक 4,318 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने टीसीएस स्टॉकवर होल्ड रेटिंग जाहीर केली होती. तज्ञांनी मागील आठवड्यात टीसीएस स्टॉकवर 4,140 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती.
मागील एका वर्षात टीसीएस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 26.98 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.61 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात टीसीएस स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 12.33 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 102.80 टक्के मजबूत झाली आहे. मागील दोन वर्षांत स्टॉक टीसीएस स्टॉक 34.93 टक्के आणि तीन वर्षांत 33.02 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		