TCS Share Price | भरवशाचा टीसीएस शेअर मजबूत तेजीत येणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राइस जाहीर

TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.76 टक्क्यांच्या वाढीसह 4071.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत.

जागतिक ब्रोकरेज फर्म UBS ने टीसीएस स्टॉकवर रेटिंग न्यूट्रल वरून ‘बाय’ वर अपग्रेड केली आहे. तज्ञांनी टीसीएस स्टॉकची टारगेट प्राइस 4,000 रुपयेवरून वाढवून 4,700 रुपये केली आहे. आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी टीसीएस स्टॉक 0.73 टक्के वाढीसह 4,134.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

दुसरीकडे विविध ब्रोकरेज फर्मच्या 25 तज्ञांनी टीसीएस स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यापैकी 11 तज्ञांनी शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तर 11 तज्ञांनी नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये टीसीएस कंपनीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तज्ञांनी टीसीएस कंपनीच्या महसूल संकलनात 100 ते 150 बेसिस पॉइंट्सच्या वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत टीसीएस कंपनीने 60,583 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा 12,016 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीने या डिसेंबर तिमाहीत 15,155 कोटी रुपये EBITDA नोंदवला आहे. त्याच वेळी, EBITDA मार्जिन 70 बेसिस पॉइंट्सने वाढून 25 टक्के नोंदवले गेले आहे. टीसीएस कंपनीने डिसेंबर तिमाहीत जवळपास 8.1 बिलियन डॉलर्स मूल्याच्या डील्स जिंकल्या आहेत. आणि या कंपनीने डिसेंबर तिमाहीत 11.2 बिलियन डॉलर्सचे सौदे केले होते.

मागील एका वर्षात टीसीएस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. 2024 यावर्षात टीसीएस कंपनीच्या शेअर्सची किंमत 7 टक्क्यांनी वाढली आहे. मागील सहा महिन्यांत टीसीएस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात टीसीएस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 4184.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3070.25 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price NSE Live 28 February 2024.