4 October 2023 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 04 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट, इंडेक्स नंबर घसरल्याने आता DA किती वाढणार? Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील BOI Net Banking | सरकारी बँक ऑफ इंडियाच्या FD योजनेवरील व्याजदरात वाढ, गुंतवणूकदारांना मिळणार इतकं अधिक व्याज
x

TCS Share Price | हमखास नफ्याचा टीसीएस शेअर स्वस्त झालाय, तज्ज्ञांकडून 'ही' टार्गेट प्राईस जाहीर, करणार का खरेदी?

TCS Share Price

TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टीसीएस’ या दिग्गज आयटी कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी TCS कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के घसरणीसह 3,286.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज शेअर बाजारात सर्वत्र लाल रंग पाहायला मिळत होता. जेमतेम मोजके शेअर हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. मात्र ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात ‘टीसीएस’ कंपनीच्या शेअरसाठी 3,950 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शेअर मार्केटमधील 28 पैकी 22 तज्ञांनी टीसीएस कंपनीचे शेअर्स पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

TCS स्टॉकची कामगिरी :
जर आपण टीसीएस कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर, तुम्हाला समजेल की, हा स्टॉक मागील एक महिन्यात बराच कमजोर झाला आहे. सोमवार दिनांक 13 मार्च रोजी शेअरची किंमत 1.34 टक्के घसरली आहे. तर टीसीएस कंपनीच्या स्टॉकने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे 6.11 टक्के नुकसान केले आहे. मागील सहा महिन्यांत ‘टीसीएस’ कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 5.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी TCS स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांना सध्या 9.79 टक्के नुकसान सहन करावे लागत आहे. टीसीएस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 3835 रुपये होती. तर नीचांक किंमत 2926.10 रुपये होती.

डिसेंबर 2022 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टीसीएस कंपनीच्या कमाईमध्ये 10.6 टक्के वाढ झाली होती. तर TCS कंपनीच्या मार्जिनमध्ये अंदाजापेक्षा कमी वाढ पाहायला मिळाली होती. डिसेंबर 2022 तिमाहीत टीसीएस कंपनीचे मार्जिन 24.5 टक्के नोंदवले गेले होते, तर सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचा एकूण मार्जिन 24 टक्के नोंदवला गेला होता. डिसेंबर 2022 TCS कंपनीने 4 टक्के वाढीसह 10846 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख / बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा . तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही . शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या . शेअर खरेदी / विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे . म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते . त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही .

News Title | TCS Share Price return on investment check details on 13 March 2023.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x