
TCS Shares Buyback | आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) संचालक मंडळ 11 ऑक्टोबररोजी शेअर बायबॅकच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. त्याच दिवशी टीसीएस दुसऱ्या तिमाहीचे निकालही जाहीर करेल. एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे.
9 ते 23 मार्च 2022 या कालावधीत टीसीएसने 4 कोटी शेअर्स ची पुनर्खरेदी केली होती. स्टॉक एक्स्चेंजमध्ये उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने 4,500 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स परत खरेदी केले होते, ज्याची किंमत सुमारे 18,000 कोटी रुपये होती.
टीसीएसची ही पाचवी बायबॅक असेल
जर कंपनीच्या संचालक मंडळाने ११ ऑक्टोबररोजी बायबॅकला मंजुरी दिली तर २०१७ नंतर टीसीएसची ही पाचवी बायबॅक असेल. टीसीएसने यापूर्वी ऑक्टोबर 2020, जून 2018 आणि फेब्रुवारी 2017 मध्ये बायबॅक आणली होती. टीसीएसने या तीन वर्षांत १६,००० कोटी रुपयांचे समभाग परत खरेदी केले.
कंपनीने 2020 मध्ये 3,000 रुपये, 2018 मध्ये 2,100 रुपये आणि 2017 मध्ये 2,850 रुपये किंमतीने शेअर्स परत खरेदी केले होते. शुक्रवारी, 6 ऑक्टोबर 2023 रोजी एनएसईवर टीसीएसचा शेअर 31.90 रुपयांनी वधारून 3,621.25 रुपयांवर बंद झाला आणि आज 3,634.95 रुपयांवर बंद झाला, जो 22 एप्रिल 2022 नंतरचा उच्चांकी स्तर आहे.
शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत
टीसीएसच्या शेअरच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तराबद्दल बोलायचे झाले तर त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,634.95 रुपये आहे. तर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीबद्दल बोलायचे झाले तर त्याची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 3,050 रुपये आहे.
गेल्या 6 महिन्यांत टीसीएसच्या शेअरमध्ये जवळपास 10.97 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 1 महिन्याचा विचार केला तर गेल्या 1 महिन्यात टीसीएसच्या शेअरमध्ये जवळपास 4.80 टक्क्यांची वाढ झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.