14 December 2024 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Syschem Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सिस्केम इंडिया शेअरने 1 दिवसात 20 टक्के परतावा दिला, किंमत 54 रुपये, एवढ्या तेजीचे कारण काय?

Syschem Share Price

Syschem Share Price | सिस्केम इंडिया लिमिटेड या विशेष रसायने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 56.88 रुपये किमतीवर पोहचले होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19.77 टक्के वाढीसह 56.77 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक झालेली वाढ एका ऑर्डरमुळे पाहायला मिळाली आहे.

नुकताच या कंपनीला 5.74 कोटी रुपयेची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर खरेदी करायला सुरुवात केली आहे. आज गुरूवार दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 54.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, Infinity Laboratories Pvt Ltd कंपनीने सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीला 5000 KG Cefadroxil पुरवण्याची ऑर्डर दिली आहे. याचे एकूण मूल्य 3.06 कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीला 3000 KG चे Cefadroxil IP Comp आणि 1350 KG वजनाचे Cefadroxil Monohydrate IP / BP पॉवर मेक पुरवण्याचे ऑर्डर देण्यात आली आहे. याचे एकूण मूल्य 2.68 कोटी रुपये आहे.

सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून 2023 तिमाहीत सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीने 200 टक्के वाढीसह 50.29 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीने 16.36 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. 2022 मध्ये सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीने 0.71 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो जून 2023 तिमाहीत 130 टक्के वाढीसह 1.68 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, सिस्केम इंडिया लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी 53.82 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी 46.18 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Syschem Share Price today on 24 August 2023.

हॅशटॅग्स

Syschem Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x