
TD Power Share Price | टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीडी पॉवर सिस्टीम्स या हेवी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड खरेदी पाहायला मिळत होती. अशीच काहीशी तेजी आज देखील पाहायला मिळत आहे.
मागील तीन वर्षांत टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 8 जानेवारी 2021 रोजी टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 29.21 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 280 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 286.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील तीन वर्षांत टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 884.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत सेन्सेक्स निर्देशांक 46.64 टक्के वाढला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 99.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 223 टक्के वाढली आहे.
7 फेब्रुवारी 2023 रोजी टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 121.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 14 डिसेंबर 2023 रोजी टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 307.90 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 8 टक्के कमजोर आहे.
तज्ञांच्या मते टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स दैनंदिन चार्टवर 300 रुपये किमतीच्या मजबूत ब्रेकआउटसह ट्रेड करत आहेत. अशा परिस्थितीत हा स्टॉक अल्पावधीत 327 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. हा स्टॉकची सपोर्ट लेव्हल 258 रुपये किमतीवर ठेवण्यात आली आहे. टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 32.8 कोटी निव्वळ नफा कमावला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 19.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
सप्टेंबर 2023 तिमाहीत टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीने 276.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 219 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीचा ऑपरेटिंग नफा 47.2 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा ऑपरेटींग नफा 25.7 कोटी रुपये होता. टीडी पॉवर सिस्टीम्स ही कंपनी मुख्यतः कस्टमाइज्ड एअर कंडिशनिंग जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटर्स बनवण्याचे काम करते. यासह ही कंपनी जनरेटर, मोटर्स, स्पेअर्स देखील बनवते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.