 
						Tera Software share Price | ओएनजीसीच्या ई-निविदेत सामील होण्यासाठी टेरा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीने सितारा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत संयुक्त उपक्रम स्थपान करण्याचा करार केला असल्याची माहिती मिळाली आहे. या संयुक्त उपक्रम करारांतर्गत टेरा सॉफ्टवेअर कंपनीने एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. (Tera share Price)
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ओएनजीसी कंपनीने नुकताच सर्वेक्षण, अभियांत्रिकी, पुरवठा, स्थापना आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू केली होती. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी टेरा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 48.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
ओएनजीसी कंपनीच्या या ई-निविदेत भाग घेण्यासाठी टेरा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीने एक संयुक्त उपक्रम कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. टेरा सॉफ्टवेअर लिमिटेड ही एक सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रदाता कंपनी आहे. टेरा सॉफ्टवेअर कंपनी गोवा राज्यात शाळांमध्ये साक्षरता प्रकल्पही राबवते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 58 कोटी रुपये आहे.
टेरा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरची किंमत मागील 3 वर्षांपासून वार्षिक 20 टक्के या दराने वाढत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेरा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्स एक टक्के वाढीसह 46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टेरा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे.
जून तिमाहीत जाहीर केलेल्या निकालात टेरा सॉफ्टवेअर कंपनीने विक्रीमध्ये 22 पट वाढ सध्या केली असून 46 कोटी सेल्स नोंदवला आहे. कंपनीने 1750 टक्के वाढीसह 3.50 कोटी निव्वळ नफा कमावला आहे. मागील 3 वर्षांत टेरा सॉफ्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 110 टक्के परतावा मिळवला आहे.
टेरा सॉफ्ट कंपनीचे शेअर्स 3 एप्रिल 2020 रोजी 13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुंतवणूकदारांनी 250 टक्के नफा कमावला आहे. आज शेअरची किंमत 48.80 रुपये किमतीवर पोहचली आहे. मागील 1 वर्षात टेरा सॉफ्ट कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 मार्च 2026 रोजी टेरासॉफ्ट कंपनीचे शेअर्स 29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		