Titagarh Rail Share Price | टिटागड रेल सिस्टिम्स शेअर्समध्ये तुफान तेजी, स्टॉक आज अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करतोय, नेंमक कारण काय?

Titagarh Rail Share Price | टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड या रेल्वे क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी खुश खबर आली आहे. टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. एप्रिल ते जून 2023 या तिमाही कालावधीत टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने 61.77 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील एका वर्षात टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर्स 5.20 टक्के वाढीसह 667.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जून तिमाही निकाल :

मागील वर्षी जून 2022 तिमाहीत टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीला 6.46 लाख रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर जून 2023 तिमाहीत टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीने कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला आहे. एप्रिल ते जून 2023 या तिमाही कालावधीत टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीने 914.64 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 440.78 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

गुंतवणुकीवर परतावा :

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीचे शेअर बीएसई इंडेक्सवर 1.13 टक्क्यांच्या घसरणीसह 614.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45.12 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 45.12 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 39.14 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titagarh Rail Share Price today on 25 July 2023.